मानवतेचे धडे नको, बंधकांना मुक्त करा, तरच ‘गाझा’ला पाणी – इस्रायलची कठोर भूमिका | Israel warns Hamas

मानवतेचे धडे नको, बंधकांना मुक्त करा, तरच ‘गाझा’ला पाणी – इस्रायलची कठोर भूमिका | Israel warns Hamas
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंधक बनवण्यात आलेल्या ९७ इस्रायली नागरिकांची सुटका होईपर्यंत गाझात पाण्याचा थेंबही पोहोचणार नाही, तिथे वीजही सुरू होणार नाही, अशा शब्दांत इस्रायलने गाझात मदत करू इच्छिणाऱ्या संस्थांना खडसावले आहे.  द टेलेग्राफ या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.  (Israel warns Hamas)

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ९७ नागरिकांना बंधक बनवले आहे. या नागरिकांची जोपर्यंत सुटका होत नाही, तोपर्यंत गाझात वीज, पाणी, तेल पोहोचणार नाही अशी भूमिका इस्रायलने घेतली आहे. "मानवतेसाठी मानवता असते, त्यामुळे आम्हाला कुणी मानवतेचे धडे देऊ नयेत," असे इस्रायलचे ऊर्जामंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "जोपर्यंत बंधक बनवलेल्या इस्रायलच्या नागरिकांना मुक्त केले जात नाही, तोपर्यंत वीज सुरू होणार नाही, पाण मिळणार नाही, आणि तेलांचे ट्रक आत जाऊ शकणार नाहीत," असे ते म्हणाले.

शनिवारी इस्रायलवर हमासने हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीला पूर्ण घेराव घातला आहे. गाझा पट्टीत जवळपास २३ लाख लोक राहतात. इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून गाझात हल्ले केले आहेत. त्यामुळे गाझातील रुग्णालयात जखमींची प्रचंड गर्दी झालेली आहे. रेड क्रॉस इंटरनॅशनल या संस्थेने गाझात किमान इंधन तरी पोहोचू द्यावे अशी मागणी केली होती.

रेडक्रॉसचे म्हणणे काय? Israel warns Hamas

इंटरनॅशनल कमिटी फॉर रेडक्रॉस या संस्थेने गाझातील हॉस्पिटलमधील इंधन संपत असल्याचे म्हटले होते. मध्य-पूर्वेतील रेडक्रॉसचे समन्वयक फॅब्रिजियो कारबोनी म्हणाले, "गाझातील हॉस्पिटलमध्ये फक्त काही तासांपुरतेच इंधन आहे. या इंधनावर जनरेटर चालत आहेत."

तर गाझात मदत पोहोचावी यासाठी हमासही इजिप्त, कतर, आणि संयुक्त राष्ट्रांच्या संपर्कात आहे, अशी बातमी अल जझिराने दिली आहे. यासाठी गाझा पट्टीत मानवी कॉरिडॉर बनवण्यासाठीही हमासची तयारी आहे. गाझातील स्थितीबद्दल जगाने उघड्या डोळ्यांनी पाहावे, असे हमास पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य गाझी हमाद याने म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news