Bihar trust vote | बिहारमध्ये नितीशकुमार पास; NDA ने सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

Bihar trust vote | बिहारमध्ये नितीशकुमार पास; NDA ने सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : 'एनडीए'मध्ये सामील होऊन नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी आज सोमवारी बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यांना १२९ आमदारांनी पाठिंबा दिला. दरम्यान, विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. (Bihar trust vote)

दरम्यान, बिहार विधानसभेचे अध्यक्ष आणि आरजेडी नेते अवध बिहारी चौधरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आज राज्य विधानसभेत मंजूर झाला. अविश्वास ठरावाच्या बाजूने १२५ सदस्यांनी मतदान केले. तर विरोधात ११२ सदस्यांनी मतदान केले. त्यानंतर सभागृहात विरोधी आमदारांनी गदारोळ घातला.

बिहारमध्ये बहुमत चाचणीपूर्वी आज आरजेडीला मोठा झटका बसला. बिहार विधानसभेत आरजेडीचे आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव हे सत्ताधारी बाकावर बसले.

दरम्यान, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या अभिभाषणाने आज बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यांनी आपल्या अभिभाषणात बिहार सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.

बिहारमध्ये विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजप आणि जेडी(यू) यांनी त्यांच्या आमदारांना दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले होते आणि तर आरजेडीचे आमदार माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांच्या अधिकृत निवासस्थानी वास्तव्यास होते. यामुळे रविवारी रात्री तेजस्वी यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. RJD आमदारांपैकी एक चेतन यादव यांच्या कुटुंबीयांनी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने त्यांचे अपहरण केल्याचा दावा केल्यानंतर काही तासांनी पोलिस तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, रविवारी बिहारचे मंत्री आणि जेडीयू नेते विजय कुमार चौधरी यांच्या घरी बैठक झाली होती. पण त्यावेळी पक्षाचे दोन ते तीन आमदार यावेळी उपस्थित राहिले नव्हते. चौधरी यांनी मात्र त्यांच्या अनुपस्थितीबाबत आमदारांनी पक्षाला कळवले असल्याचा खुलासा केला होता.

बैठकीदरम्यान जेडीयू प्रमुख नितीशकुमार यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना सोमवारी सभागृहात एकजुटीने राहण्याचा सल्ला दिला होता.

बिहार विधानसभेतील बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर जेडीयूचे राष्ट्रीय सचिव राजीव रंजन प्रसाद यांनी म्हटले होते की, "मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार बहुमत सिद्ध करेल आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल."

एनडीएने १२८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा याआधीच केला होता. २४३ सदस्यांच्या विधानसभेत १२२ च्या बहुमतांच्या आकड्यापेक्षा एनडीएकडे सहा आमदार अधिक आहेत. यात भाजप ७८, जेडीयू ४५, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) ४ आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे. आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (एमएल) लिबरेशन, सीपीआय आणि सीपीआय (एम) यांचा समावेश असलेल्या महाआघाडीकडे (महागठबंधन) ११४ आमदार आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमकडे एक आमदार आहे.

नितीशकुमार यांनी २८ जानेवारी रोजी विक्रमी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि महाआघाडीतील परिस्थिती काही योग्य नसल्याचे म्हटले होते. नितीशकुमारांनी महाआघाडी आणि विरोधी गट INDIA आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news