पंतप्रधान नरेंद्र माेदी, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार. ( संग्रहित छायाचित्र)
पंतप्रधान नरेंद्र माेदी, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार. ( संग्रहित छायाचित्र)

“बिहारच्‍या विकासासाठी… “: PM मोदींनी केले नितीश कुमारांचे अभिनंदन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारच्‍या राजकारणात मागील दोन दिवसांमध्‍ये कमालीच्‍या वेगाने घडामोडी घडल्‍या. मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीशकुमारांनी राष्‍ट्रीय जनता दलाची साथ सोडली. पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सत्ताग्रहण करत मुख्‍यमंत्रीपदाची शपथही त्‍यांनी घेतली. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे. (PM Modi congratulates Nitish Kumar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे की, "बिहारमध्ये स्थापन झालेले रालोआ सरकार राज्याच्या विकासासाठी आणि तेथील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली म्हणून मी नितीश कुमार यांचे तर उपमुख्‍यमंत्रीपदी शपथ घेतलेल्‍या सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचे अभिनंदन करतो. मी मला विश्‍वासह आहे की रालोआची ही टीम राज्‍यातील जनतेचेी समर्पणाने सेवा करेल." (PM Modi congratulates Nitish Kumar)

नितीश कुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) अंतर्गत भाजपसोबत युती करून बिहारमध्‍ये 2020 च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. कुमार यांच्या जेडीयूने 43 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 74 जागा जिंकल्या होत्या. कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु त्यांनी 2022 मध्ये भाजपबरोबरील युती तोडली आणिराष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्‍याचा सहभाग असणार्‍या महाआघाडीचे सरकार स्‍थापन केले. यावेळी तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. दोन वर्षांनंतर नितीश कुमार यांचे आरजेडी आणि काँग्रेसबरोबर मतभेद झाले. त्‍यांनी पुन्‍हा एकदा भाजपच्‍या साथीने बिहारमध्‍ये सरकार स्‍थापन केले आहे.

२०१५ च्‍या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्‍या जनता दल संयुक्‍त (जेडीयू ) पक्षाने राष्‍ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महाआघाडी करत विजय मिळवला होता. त्‍यावेळी बिहार विधानसभेच्‍या २४३ जागांपैकी १७८ जागांवर महाआघाडीला यश मिळाले होत. राष्‍ट्रीय जनता दल ८० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर जेडीयूला ७१ तर काँग्रेसने २७ जागा जिंकल्‍या होत्‍या. या निवडणुकीत भाजप नेतृत्त्‍वाखालील रालोआला फक्त ५३ जागांवर समाधान मानावे लागले होते. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु त्यांनी 2017 मध्ये युती सोडली आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत पुन्‍हा एकदा भाजपबरोबर युती केली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news