पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय भूमिकेवरुन चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत आपण निवडणूक लढवणार की नाही याबद्दल स्पष्ट केले आहे. यावरुन पुन्हा एकदा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. (Nilesh Rane)
निलेश राणे यांनी आपल्या 'X' वर पोस्ट करत म्हटलं आहे की,"मी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही हे स्पष्ट करतो, या आधी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे आज परत करतो कारण आज एका चॅनलवर ही बातमी मी बघितली. मी सध्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम करतोय आणि तिथेच करत राहणार. धन्यवाद."