पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील फगवाडा येथील गुरुद्वारामध्ये एका निहंग शीखाने अपवित्र वर्तन केल्याच्या संशायातून एका तरुणाची हत्या केली. रमणदीप सिंग असे संशयित आरोपीचे नाव आहे. निहंगने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून हत्या केल्याची कबूली दिली. या घटनेनंतर गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना एसपी फगवारा गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, एका निहंग शीखने गुरुद्वारा श्री चौरा खुह साहिबमध्ये एका तरुणाची संशयावरून हत्या केली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून पुढील तपास सुरू आहे.
हत्येचे कारण गुरुद्वारा साहिबमध्ये संबंधित तरुणाने अयोग्य वर्तन केल्याचे सांगितले जात आहे. या रागातूनच निहंग शीखाने तरुणाची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने स्वतःला गुरुद्वारामध्ये कोंडून घेतले आहे. पोलिसांनी गुरुद्वाराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे.
तरुणाची हत्या करण्यापूर्वी निहंग शीख राममंडप सिंगने व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये तो तरुणाची चौकशी करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो तरुण सांगतो की, त्याला अपवित्रासाठी २ ते ३ हजार रुपये मिळणार होते. या व्हिडीओमध्ये तो तरुण त्याला कोणीतरी पाठवल्याचे सांगत आहे. त्याला गुरुद्वारात जाऊन विचित्र काम करण्यास सांगितले. पण मी काहीही केले नाही, मी प्रामाणिक आणि मेहनती आहे, असे तो म्हणत असल्याचे दिसून येते.
हेही वाचा :