कोईम्बतूरमधील मोटारकार स्फोटाची ‘एनआयए’ करणार चौकशी

कोईम्बतूरमधील मोटारकार स्फोटाची ‘एनआयए’ करणार चौकशी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे झालेल्या मोटारकार स्फोटाची राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. गेल्या रविवारी एका मंदिराजवळ मोटारकारमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीची काही वर्षांपूर्वी दहशतवादी कृत्याबद्दल 'एनआयए'ने चौकशी केली होती.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी कोईम्बतूरमधील या प्रकरणाची 'एनआयए'मार्फत चौकशी करण्याची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने 'एनआयए' चौकशीचे आदेश जारी केले आहेत. कोईम्बतूरमधील ज्या उक्कडम भागात स्फोट झाला होता, तो भाग संवेदनशील समजला जातो.

स्फोटानंतर कोईम्बतूरमधील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्फोटात ठार झालेल्या जमिशा मुबिन याच्या सहा साथीदारांना आतापर्यंत तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्याची (युएपीए) कलमे देखील लावण्यात आली आहेत. स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसांनी मुबिनच्या घरावर धाड टाकली असता तेथे मोठ्या प्रमाणावर विस्फोटके बनविण्याची सामुग्री सापडली होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news