पुढारी ऑनलाईन डेस्क: दहशतवादी नेटवर्क प्रकरणी दहशतवादी नेटवर्क प्रकरणी एनआयएने (NIA) आज (दि.१८) पहाटे मोठी कारवाई केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) महाराष्ट्रासह इतर तीन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. भारतातील दक्षिणेकडील चार राज्यातील १९ ठिकाणी एनआयएने छापे टाकले. तसेच याठिकाणी तपास करत, दहशतवादाचा पर्दाफाश केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (NIA Raids In India)
'इंडिया टुडे' ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी भारतातील दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई केली. दरम्यान एनआयएने कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादविरोधी छापे टाकले. (NIA Raids In India)
एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने आज पहाटे महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड आणि पुणे तसेच कर्नाटकातील बंगळूर येथे तब्बल ४४ ठिकाणी छापे टाकल्याचे इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (NIA Raids)