पुणे : शिक्रापूरला आढळली गोरखमुंडीची नवी प्रजाती

KHARMUNDI
KHARMUNDI
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आतापर्यंत केवळ आफ्रिकेत आढळणारी गोरखमुंडी Spaeranthus Gomphrenoides (Compositae) या वनस्पतीची वेगळी प्रजाती पुण्याजवळ शिक्रापूर येथे आढळली असून, या नव्या नोंदीची दखल घेणारा लेख फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय निबंधपत्रिकेत प्रसिद्घ झाला आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वर्षा निंबाळकर यांनी ही आशिया खंडासाठीची मोठी बातमी सोशल मीडियावर जाहीर केली. थिस्टल प्रकारची ही वनस्पती आतापर्यंत आफ्रिकन देशांमध्ये आढळून येत आली आहे. मात्र, आशिया खंडात प्रथमच तिची नोंद छायाचित्रांसह झाली आणि या प्रजातीची भारतातील संख्या पाच वर गेल्याचे निंबाळकर सांगतात. या जातीच्या एकूण 39 प्रजाती जगभरात आढळतात.

वर्षा निंबाळकर, ओशिन शर्मा, मिलिंद गिरधारी आणि मिलिंद सरदेसाई या चौघांचा संयुक्त लेख फायटोटॅक्सा निबंध पत्रिकेत प्रसिद्घ झाला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले मिलिंद गिरधारी वनस्पती अभ्यासक असून, शिक्रापूर जवळील शाळेला भेट देण्यास गेले असता शाळेजवळील एका ओढ्याजवळ त्यांना ही वनस्पती आढळली. ही वनस्पती गोरखमुंडीसारखी असली तरी ती वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात संशोधनकार्य करणार्‍या त्यांच्या विद्यार्थिनी वर्षा निंबाळकर-शेलार व ओशीन शर्मा यांच्यासह प्रत्यक्ष स्थळावर जाऊन वनस्पतीचे नमुने गोळा केले.

प्रा. मिलिंद सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी केली असता आणि या कुळातील व वंशातील सर्व वनस्पतींचे संदर्भ साहित्य अभ्यासले असता. ही वनस्पती डरिशीरपींर्हीी ॠेाहिीशपेळवशी (उेािेीळींरश) असल्याचे सिद्ध झाले. गोरखमुंडी प्रमाणेच ही वनस्पती देखील औषधी असल्याचे संदर्भ मिळाले आहेत. ही वनस्पती आफ्रिका खंडातील देशांमध्ये यापूर्वी आढळलेली आहे. मात्र संपूर्ण आशिया खंडात भारतातून तिची प्रथमच पुण्याजवळ नोंद झाल्याने वनस्पतीप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news