Rang Majha Vegala : ही असेल ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील नवी कार्तिकी

rang majha vegala
rang majha vegala
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मालिका 'रंग माझा वेगळा'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. (Rang Majha Vegala) लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. मैत्रेयीने जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे. (Rang Majha Vegala)

Rang Majha Vegala
Rang Majha Vegala

मैत्रेयीची 'रंग माझा वेगळा' ही आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र तिच्या ओळखीचं आहे. कार्तिकी आणि दीपिकाची जोडी तर तिला खूपच आवडते. आपलं आवडीचं पात्र साकारायला मिळणार, हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला.

सेटवरही मैत्रेयीचं खास स्वागत करण्यात आलं. दीपिकाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या चिमुकल्या स्पृहासोबत तर तिची पहिल्या दिवासापासून छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधील फावल्या वेळेत अभ्यास आणि मनसोक्त खेळणं हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे 'मैत्रेयी'साठी हा मालिकेचा सेट नसून दुसरं घर आहे. पडद्यामागील दोघींची 'ही' खास मैत्री पडद्यावरही नक्कीच दिसेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news