नगर : बाळासाहेब मुरकुटेंच्या ताब्यातील देवगाव सेवा सोसायटीत सत्तांतर | पुढारी

नगर : बाळासाहेब मुरकुटेंच्या ताब्यातील देवगाव सेवा सोसायटीत सत्तांतर

नेवासा : पुढारी वृत्तसेवा:  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या ताब्यातील देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये सत्तांतर झाले आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील शेतकरी विकास पॅनेलने सर्व जागा जिंकून सत्ता काबिज केली.

नेवासा तालुक्यातील महत्वाची देवगाव सोसायटीची सत्ता आजपर्यंत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात होती. सोसायटीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटीच्या मुदतीपर्यंत मुरकुटे गटाला एक ही उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. परंतु, ज्ञानदेव कारभारी पाडळे व त्यांच्या पत्नी चंद्रकला ज्ञानदेव पाडळे या दिघांचेच अपक्ष उमेदवारी अर्ज राहिल्याने एकूण 10 जागांसाठी निवडणूक लागली. रविवारी मतदान होऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

त्यामुळे सर्व 13 जागा या पॅनेलने जिंकल्या. देवगाव सोसायटी संचालक मंडळावर मंत्री गडाख यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांची वर्णी लागली. लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील शेतकरी विकास पॅनलचे निवडून आलेले उमेदवार : बाबानाथ कारभारी आगळे, गोरक्षनाथ आसाराम निकम, सुभाष विश्वनाथ निकम, ज्ञानदेव सिताराम निकम, बाबासाहेब गोवर्धन पाडळे, कुंदनमल शांतीलाल भंडारी, शिवाजी गोरक्षनाथ मोरे, नुरमहमंद शेखनुर शेख, पार्वती मारुती ठोंबरे, शारदा राधाकृष्ण शिंदे, बिनविरोध : चंद्रभान अंबादास रोडगे, माच्छींद्र योसेफ काळे, सखाहरी कारभारी गायकवाड शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व पंचायत समिती माजी सदस्य अजित मुरकुटे, महेश निकम, गोरक्षनाथ निकम, अशोक गुंदेचा, कचरदास गुंदेचा, पमाभाऊ शिंदे, आगळे बाबा, रावसाहेब निकम, सकाहरी आगळे, खान साहेब यांनी केले.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना स्वत:च्या गावातील देवगाव सोसायटी निवडणुकीत उभे करण्यासाठी उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेवराला फूस लावून अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवून सोसायटीची निवडणूक लादली. सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
-महेश निकम, माजी उपसरपंच, देवगाव

Back to top button