थोरातांचा जावई हुशार : ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय शोधण्यात योगदान;  IIT मुंबईचे मोठे संशोधन

थोरातांचा जावई हुशार : ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय शोधण्यात योगदान;  IIT मुंबईचे मोठे संशोधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : IIT मुंबईने ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी जिनॅटिक उपचार पद्धती विकसित केली आहे. भारतात प्रथमच विकसित करण्यात आलेल्या उपचार पद्धतीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने मान्यता दिली आहे. या नव्या उपचार पद्धतीमुळे जिनॅटिक्स वर आधारित ब्लड कॅन्सरवरील उपचार पद्धतीत देशांत अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. ( NEXCAR19 Blood Cancer Treatment )

IIT मुंबईचे डॉ. राहुल पुरवार यांनी ही CAR T Cell उपचार पद्धती शोधली आहे. याला NexCAR19 असे नाव देण्यात आले आहे. या संशोधनात टाटा हॉस्पिटलचे डॉ. हसमुख जैन यांनीही योगदान दिले आहे. डॉ. हसमुख जैन काँग्रेस नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे जावई आहेत. या उपचार पद्धतीला मान्यता मिळाल्याची माहिती थोरात यांनी 'एक्स'वर दिली आहे.

ब्लड कॅन्सर असणाऱ्या रुग्णांवर शेवटच्या टप्प्यात कोणतेच उपचार परिणामकारक ठरत नाहीत. अशा वेळी रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी काढून त्यांच्यावर उपचार केले जातात. अमेरिकेत या उपचार पद्धतीचा प्राथमिक टप्पा उपलब्ध होता; पण त्याला सुमारे ४ कोटी रुपये इतका खर्च येतो, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे. पण IIT मुंबई आणि टाटा हॉस्पिटल यांनी १० वर्षं संशोधन करून ही उपचार पद्धती भारतात उपलब्ध केली आहे. अमेरिकेशी तुलना करता फक्त १० टक्के खर्चात हे उपचार भारतात उपलब्ध झाले आहेत, असे थोरात यांनी म्हटले आहे. या उपचाराची चाचणी टाटा हॉस्पिटलमध्ये झाली, यात ७० टक्के रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसून आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news