Neptune Image : अबब! नेप्च्यूनला आहे शनिग्रहापेक्षाही मोठ्या कडा, पाहा नासाची नवीन छायाचित्रे

 Neptune Image : अबब! नेप्च्यूनला आहे शनिग्रहापेक्षाही मोठ्या कडा, पाहा नासाची नवीन छायाचित्रे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काढलेली नेप्च्यूनची नवीन छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. (Neptune Image ) या छायाचित्रात नेपच्यून ग्रहाच्या कड्याही स्पष्ट दिसत आहे. यामध्ये नेप्च्यूनला शनिपेक्षाही मोठ्या कडा असल्याचे स्पष्ट होत आहे.

1989 मध्ये व्हॉयेजर 2 अंतराळ यानाने उड्डाण केले. तेव्हा असे स्पष्ट आणि जवळचे चित्र दिसले होते. पण नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे  प्रसिद्ध केलेले नवीन छायाचित्रासारखे स्पष्ट छायाचित्र नव्हते. नासाने आता काढलेले छायाचित्र अधिक स्पष्ट आहे. वेब दुर्बिणीतून काढलेल्या या चित्रात नेपच्यूनच्या अनेक तेजस्वी वलयांच्या व्यतिरिक्त नेपच्यूनच्या धुरकट धुळीचा पट्टाही दिसत आहे.

नेपच्यून सिस्टीम एक्सपॅट हेडी हॅमेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्ही शेवटच्या वेळी तीन दशकांपूर्वी असे अस्पष्ट, धुळीने माखलेल्या रिंग्स पाहिल्या होत्या.  इन्फ्रारेडमध्ये पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 Neptune Image : नेपच्यून निळा दिसत नाही

हेडी हॅमेल असेही म्हणाले की, नेपच्यून आपल्या ग्रहापेक्षा सूर्यापासून 30 पट दूर आहे. नेपच्यूनला निळा ग्रह म्हणून पाहतो. परंतु जेम्स वेब टेलिस्कोपमधून आपण निअर-इन्फ्रारेड कॅमेरा (NIRCam) प्रतिमा पाहतो तेव्हा नेपच्यून निळा दिसत नाही. याचे कारण हे आहे की ते जवळच्या-अवरक्त श्रेणीतील प्रकाश कॅप्चर करते. याशिवाय विषुववृत्ताला प्रदक्षिणा घालणाऱ्या या प्रतिमेत एक बारीकशी तेजस्वी रेषाही दिसू शकते. नेपच्यूनची कक्षा १६४ वर्षे जुनी आहे. त्यामुळे त्याचा उत्तर ध्रुव नीट दिसत नाही. परंतु या वेब इमेजमध्ये या क्षेत्राकडे लक्ष वेधले जात आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

हेही वाचलंत का?

Neptune Image
Neptune Image

(फोटो सोर्स- नासा)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news