Niira Radia tapes case | टेप लीक प्रकरणी नीरा राडिया यांना सीबीआयकडून क्लिन चीट | पुढारी

Niira Radia tapes case | टेप लीक प्रकरणी नीरा राडिया यांना सीबीआयकडून क्लिन चीट

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांना प्रमुख राजकीय नेते, उद्योगपती आणि मीडियाशी संबंधित व्यक्तींशी केलेल्या कथित संभाषण प्रकरणी (Niira Radia tapes case) क्लिन चीट दिली आहे. सीबीआयने एक दशकापूर्वी केलेल्या चौकशीचा भाग म्हणून आयकर विभागाने टॅप केलेल्या ८ हजार फोन संभाषणांची चौकशी करण्यासाठी १४ प्राथमिक स्वरुपाच्या चौकश्या केल्या होत्या. आता या प्रकरणी चौकशी थांबवली. यामुळे त्यांच्याविरोधात आता एकही प्रकरण नाही.

2G घोटाळ्याच्या संदर्भात नीरा राडिया आणि त्यांच्या ग्राहकांमधील संभाषणाचे कथितरित्या फोन टॅप करण्यात आले होते. हे संभाषण लीक झाल्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. २००८ ते २००९ या कालावधीत नीरा राडिया यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वैष्णवी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स या पीआर कंपनीचा व्यवसाय बंद केला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुप हे नीरा राडिया यांच्या पीआर कंपनीचे ग्राहक होते.

नऊ वर्षांत राडिया यांनी ३०० कोटी उलाढाल असलेला व्यवसाय उभा केला होता. याबाबत १६ नोव्हेंबर २००७ रोजी तत्कालीन अर्थमंत्र्यांनी आयकर खात्याकडे तक्रार दाखल केली होती. राडिया यांच्या फोन संभाषणावर पाळत ठेवण्याचा भाग म्हणून त्यांचे कथितरित्या संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. यामुळे राडिया चौकशीच्या घेऱ्यात सापडल्या होत्या.

नीरा राडिया यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप लीक झाली होती. यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. या ऑडिओ क्लिपमध्ये नीरा राडिया यांनी मोठे उद्योजक, राजकारणी तसेच पत्रकारांशी संवाद साधल्याचे आढळून आले होते. (Niira Radia tapes case)

हे ही वाचा :

Back to top button