पुणे : रुपी बँकेचे विलीनीकरण ‘कॉसमॉस’मध्ये करा; दोन्ही बँकांकडून अर्थमंत्र्यांकडे मागणी | पुढारी

पुणे : रुपी बँकेचे विलीनीकरण ‘कॉसमॉस’मध्ये करा; दोन्ही बँकांकडून अर्थमंत्र्यांकडे मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: येथील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरणासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत त्यांच्याकडे दोन्ही बँकांकडून संयुक्तपणे रिझर्व्ह बँकेला सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उपाध्यक्ष सचिन आपटे आणि रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी संयुक्तपणे ही मागणी केली असून, रुपी बँकेच्या या नव्या विलीनीकरण प्रस्तावावर लक्ष घालण्याचे आश्वासन अर्थमंर्त्यांनी दिले असल्याची माहिती पंडित यांनी कळविली आहे. दरम्यान, याबाबत कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Back to top button