पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra ) याचे ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकवण्याचे स्वप्न होते. त्याने उत्कृष्ट कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदावर मोहर उमटवत आपले स्वप्न साकारले. आता नीरज चोप्रा ( Neeraj Chopra ) याचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. या 'स्वप्नपूर्ती'ची माहिती त्यांने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर मोहर उमटविणारा भालाफेकपटू नीरज चोप्रावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचे स्वप्न साकारले. आता आपल्या आईवडिलांना विमान प्रवास घडवून आणायचा त्याचे स्वप्न हाेते.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर मोहर उमटविणारा भालाफेकपटू नीरज सध्या देशभरातील विविध ठिकाणी हाेणार्या सत्कार समारंभामध्ये सहभागी होत आहे. सध्या सत्कार समारंभमध्ये नीरज व्यस्त असल्याने आपल्या कुटुंबीयांना वेळ देता येत नाही ही खंत त्याने व्यक्त केली होती. तसेच कुटुंबासमवेत राहण्यासाठी २०२०१मधील काही स्पर्धांमध्ये सहभागी होणार नसल्याचेही त्याने जाहीर केले होते. मात्र २०२२मध्ये होणार्या आशियाई आणि राष्ट्रकूल स्पर्धेत सहभागी होणार असल्याचाचे त्याने स्पष्ट केले हाेते.
टोकियो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीमुळे नीरज हा आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला आहे.
लहानपणापासून त्याचे आई-वडिलांबरोबर विमानातून प्रवास करण्याचे होते स्वप्न होते.
आता ऑलिम्पिकमधील यशानंतर हे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे.
आपल्या आईवडिलांबरोबर केलेल्या विमान प्रवासचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नीरजने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिली आहे की, आज माझं आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले. मी माझ्या आईवडिलांना प्रथमच विमानात बसवले. शुभेच्छा आणि आशीर्वाद याबद्दल सर्वांचा आभार.
हेही वाचलं का ?