कराड : १२ पैकी ८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेसकडे तीन तर भाजपाकडे एक ग्रामपंचायत

कराड : १२ पैकी ८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेसकडे तीन तर भाजपाकडे एक ग्रामपंचायत

कराड : पुढारी वृत्तसेवा: कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. बारापैकी आठ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवत तालुक्यावर वर्चस मिळवले. तर काँग्रेसने तीन ग्रामपंचायती स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले असून भाजपला केवळ एक ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे.

संबंधित बातम्या 

कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी (दि.६) रोजी सकाळी प्रशासकीय इमारतीत सुरू झाली. यावेळी कराड उत्तरमधील सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार बाळासाहेब पाटील समर्थक राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर कराड दक्षिणेतील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. तर भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथील भाजपाचे सत्ता कायम ठेवत सर्वच अठरा जागांवर विजयी मिळवला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news