

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक भांडवली बाजारांमधील मिळणारे मजबूत संकेत, देशांतर्गत कंपन्यांच्या समाधानकारक कमाई आणि खनिज तेलाच्या किंमतीमधील स्थिरता आदी कारणांचा सकारात्मक परिणाम आज (दि.६) शेअर बाजारावर पाहायला मिळाला. शुक्रवारपर्यंत सलग तीन सत्रात कायम राहिलेले तेजीच्या घोडदौड आजही कायम राहिली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ५९४ अंकांनी वधारुन ६४,९५८ पातळीवर बंद झाला. तर निप्टीनेही १८१ अंकांची भर घालत १९,४११ वर स्थिरावला.
शुक्रवारी (दि.३) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निप्टी तेजीसह स्थिरावले होते. सेन्सेक्स २८२.८८ अंकांनी वधारुन ६४.३६३.७८ पातळीवर तर निप्टीनेही ९७.३५ अंशांनी भर घालत १९२३०.६० वर बंद झाला होता. तेजीचे हे सत्र सत्र आज (दि.६) आठवड्याच्या पहिल्या दिवशी कायम राहिले. जागतिक भांडवली बाजारांमधील सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहराात NSE निफ्टी 50 0.59% वर 19,345.85 तर BSE सेन्सेक्स 471.75 अंकांनी वधारत 64,835.23 वर उघडला. आशियाई बाजारातही जोरदार खरेदी दिसून आली. तिसर्या दिवशी तेजीने गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसला. बँकिंग, ऑटो, आयटी आणि इतर क्षेत्रातील खरेदीमुळे बाजारात तेजीला उधाण आले.
आजच्या व्यवहारात अॅक्सिस बँक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड या शेअर्सनी सेन्सेक्समध्ये तेजी अनुभवली. तर एसबीआय, बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात कार्यरत राहिले. कॅपिटल गुड्स, मेटल आणि रिअॅल्टी निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारले .
टाटा मोटर्स, एचयूएल, आयटीसी आणि कोटक महिंद्रा बँक या शेअर्ससह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरची किंमत सोमवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये 0.84% घसरून 573.25 रुपये झाली. बँकेने शनिवारी, आर्थिक वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत 16,383.18 कोटी रुपयांचा नफा नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 15,017.18 कोटी रुपयांच्या तुलनेत 9.1% अधिक आहे.
डॉलरच्या तुलनेत इतर आशियाई चलनांमध्ये आज मजबुती दिसून आली. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या कमकुवतपणामुळे आज भारतीय रुपयाने वाढीसह सुरुवात केली. आज रुपया 15 पैशांनी मजबूत झाला आणि डॉलरच्या तुलनेत 83.14 वर उघडला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.२९ वर बंद झाला होता. दरम्यान, आशियाई चलने डॉलरच्या तुलनेत मजबूत होत आहेत. दक्षिण कोरियाच्या चलनात 1.57 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर दुसरीकडे, जपानी येनमध्ये 0.15 टक्के आणि चीनच्या रॅन्मिन्बीमध्ये 0.1 टक्के घट झाली आहे.
खनिज तेलाच्या किमतीवर दबाव कायम आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $85 च्या खाली घसरली होती. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 82 च्या पातळीवर आहे. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत ब्रेंट क्रूडची किंमत 3% कमी झाली आहे. इस्रायल-हमास युद्धापूर्वी असणार्या क्रूडच्या किमतीने पातळी गाठली आहे.
जागतिक भांडवली बाजारांमधील सकारात्मक वातावरणामुळे शुक्रवारी (दि.३) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निप्टी तेजीसह स्थिरावले होते. सेन्सेक्स २८२.८८ अंकांनी वधारुन ६४.३६३.७८ पातळीवर बंद झघला होता. तर निप्टीनेही ९७.३५ अंशांनी भर घातल १९२३०.६० पातळीवर स्थिरावला होता. मजबूत जागतिक संकेत, देशांतर्गत कंपन्यांच्या समाधानकारक कमाईमुळे वाढलेला गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास, खनिज तेलाच्या किंमतीतील घसरणीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेले उत्साहाचे वातावरण आजही (दि.६) कायम राहिले.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या तोटा मागील आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या कालावधीत भरुन काढण्यात आला होता. या कालावधीत निर्देशांक प्रत्येकी 1.4 टक्क्यांनी वाढले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने प्रमुख धोरण दर ५.२५ ते ५.५० टक्क्यांवर कायम ठेवल्याने अपेक्षेप्रमाणे जागतिक स्तरावर याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. या आठवड्याच्या महिंद्रा आणि महिंद्रा, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, कोल इंडिया, आयशर मोटर्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी सारख्या निफ्टी 50 कंपन्यांचे कॉर्पोरेट निकाल वित्तीय बाजाराला नवीन संकेत देतील, असे गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :