बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : बंगळूरच्या खाण विभागाच्या अधिकारी प्रतिमा (वय ४५) यांचा खून त्यांच्या माजी कार चालकानेच केल्याचे उघडकीस आले आहे. किरण नावाच्या कारचालकाला पोलिसांनी चामराजनगर येथून अटक केली आहे. किरणने प्रतिमा यांची त्यांच्या घरातच चाकूने गळा कापून हत्या केली होती. नोकरीवरून कमी केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. (Bengaluru News)
प्रतिमा बंगळूरमध्ये राहत होत्या. त्यांची हत्या खाण माफियांनी केल्याचा संशय आधी व्यक्त होत होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून खून करणाऱ्याचा माग काढण्यात यश मिळवले आहे. (Bengaluru News)
प्रतिमा यांच्या कारवर किरण हा गेली पाच वर्षे चालक म्हणून काम करत होता. मात्र पंधरा दिवसांपूर्वी प्रतिमा यांनी किरणला कामावरून कमी केले होते. त्यानंतर काम मागण्यासाठी किरण पुन्हा प्रतिमा यांच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर किरणने प्रतिमा यांच्या दुप्पट्याने त्यांचा आधी गळा आवळला. त्यानंतर स्वयंपाक घरातून चाकू आणून त्यांची हत्या केली. हत्येनंतर किरणने प्रतिमा यांच्या पर्समधील पंधरा हजार रुपये घेऊन पलायन केले. रविवार रात्री त्याने बंगळूर येथून दुचाकीने चामराज नगर गाठले होते. मात्र सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याला जेरबंद केले, अशी माहिती बंगळूरचे डीसीपी राहुल कुमार यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा