NCP Sharad Pawar Symbol | ‘तुतारी’ चिन्ह देऊन निवडणूक आयोगाने आम्हाला शुभेच्छाच दिल्या- जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

NCP Sharad Pawar Symbol | ‘तुतारी’ चिन्ह देऊन निवडणूक आयोगाने आम्हाला शुभेच्छाच दिल्या- जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला. दरम्यान, निवडणूक आयोगाने कागदपत्रांच्याआधारे अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले. पुढे शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार' असे नाव देण्यात आले. त्यानंतर त्यांना तुतारी हे नवीन चिन्ह देण्यात आले. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'आम्ही सुचविलेले चिन्ह न देता, आयोगाने "तुतारी" दिले. या आयोगाकडून आम्हाला मिळालेल्या शुभेच्छाच असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवरून केली आहे. (NCP Sharad Pawar Symbol)

"तुतारी" चिन्ह देऊन आयोगाने आम्हाला शुभेच्छाच दिल्या- आव्हाड

आव्हाड यांनी पोस्यमध्ये म्हटले आहे की, "निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी "तुतारी" हे चिन्ह दिले. हे चिन्ह देऊन आयोगाने आम्हाला लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत, असेही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. (NCP Sharad Pawar Symbol)

तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका- हा आयोगाचा आमच्यासाठी संदेश

"तुतारी" हे चिन्ह आमच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार' गटासाठी 'शुभसंकेत' आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत 'तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका' असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना "तुतारी" हे चिन्ह देऊन दिला आहे. (NCP Sharad Pawar Symbol)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news