Opposition Meeting in Bangalore | विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी शरद पवार बंगळूरमध्ये दाखल

NCP Crisis
NCP Crisis

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बंगळूरमध्ये दाखल झाले. कर्नाटकचे मंत्री एम बी पाटील यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. (Opposition Meeting in Bangalore) शरद पवार या बैठकीसाठी सोमवारीच बंगळूरमध्ये येणार होते; पण ऐनवेळी त्यांनी सोमवारचा दौरा स्थगित केला होता. मात्र, ते मंगळवारच्या बैठकीला हजर राहिले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपविरोधी राजकीय पक्ष आज मंगळवारी (दि. १८) बंगळूरमध्ये एकवटले आहेत. काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत असून त्यात २६ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.

पाटण्यात झालेल्या बैठकीनंतर भाजप विरोधकांची दुसरी बैठक बंगळूरमध्ये होत आहे. सोमवारी (दि. १७) काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसह राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी नेत्यांचे बंगळुरात आगमन झाले होते.

'या' विषयांवर होणार मंथन

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, यावरही चर्चा केली जाणार आहे. तसेच ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रिया सुधारणा आदींवर चर्चा होणार आहे.

समित्या, उपसमित्या स्थापणार

सूत्रांनी सांगितले की, संभाव्य महाआघाडीचे कामकाज सूत्रबद्ध चालावे, यासाठी एक संयुक्त सचिवालयासारखी रचना तयार करण्यात येणार आहे.

सोनिया गांधी-उद्धव ठाकरे यांच्यात वीस मिनिटे चर्चा

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे बंगळूरमध्ये येताच त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. (Opposition Meeting in Bangalore)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news