छत्तीसगडच्या जंगलातील नक्षल शिबिर उद्ध्वस्त, स्फोटकांसह साहित्य जप्त

नक्षल शिबिरात सापडलेले स्फोटकांसह साहित्य
नक्षल शिबिरात सापडलेले स्फोटकांसह साहित्य

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा – छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील भोपालपट्टनम पोलीस ठाण्यांतर्गत दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवादी दबा धरून बसले होते. नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करण्यात छत्तीसगड आणि गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटके आणि अन्य नक्षल ताब्यात घेतले आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात छत्तीसगडमधील नॅशनल पार्क एरिया कमिटीचे २० ते २५ नक्षलवादी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी १६ ऑगस्टला भोपालपट्टनम पोलिसांचे डीआरजी दल आणि गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम पोलीस ठाण्यातील सी-६० पथकाचे जवान संयुक्तरित्या जंगलात पाठविण्यात आले. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे स्फोटके, डिटोनेटर, जिलेटीन, नक्षल्यांचे पिट्टू, जीवनावश्यक वापराचे साहित्य आणि पुस्तके आढळून आली. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news