कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे वैशिष्ट्यपूर्ण चालीरिती आहेत. या प्रथा-परंपरांना धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. निसर्गातील पंचमहाभूतांना केंद्रस्थानी ठेवून साजर्या होणार्या सणांपैकी एक म्हणजे घटस्थापना होय. ( Navratri 2023)
नऊ दिवसांत घट किंवा कुंभामध्ये अंकुरित होणार्या धान्यावरून पीक-पाण्याचा अंदाज घेतला जातो. या प्रक्रियेला शेतीची प्रयोगशाळा किंवा सराव चाचणी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पळसाच्या पानांची विणलेली पत्रावळी त्यावर शेतातील तांबडी किंवा काळी माती, मातीमध्ये कडधान्य, तृणधान्य, भरडधान्य अशा धान्यांची पेरण केली जाते. नऊ दिवसांमध्ये या धान्यांमधून अंकुर निर्मिती होते. विजयादशमी दसरा या दिवशी या घटाचे शेतातील मातीमध्येच विघटन केले जात होते.
संबंधित बातम्या :
दसरा झाल्यानंतर काहीच दिवसांमध्ये शेतांमध्ये भूमिपूजन केले जाते. घटस्थापनेच्या घटामध्ये आलेल्या अंकुरावरून शेतकरी राजाला जमिनीत पेरलेले धान्य किती जोमात येणार याचा अंदाज येतो.
सध्या धकाधकीच्या आणि आधुनिक जीवनामध्ये घटस्थापना ही केली जाते. परंतु या घटांमागील ही संकल्पना नवीन पिढीपर्यंत पोहोचल्याचे दिसत नाही. संकरित बियाणांमुळे अंकुर निर्मिती देखील कमी प्रमाणात होते. यासाठी नैसर्गिक पद्धतीने घटस्थापना करून त्याचे घरच्या घरीच विघटन करणे गरजेचे आहे. ( Navratri 2023)
यंदाचे वर्ष हे पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर राबवले जात आहे. घरातील घटामध्ये देशी बी बियाणांची पेरणी करून नऊ दिवसांनी या घटांनाचे कुठेही विसर्जन न करता उगवलेल्या अंकुरांपासून रोप निर्मिती किंवा पौष्टिक पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेणे सार्थ ठरेल. दसर्यानिमित्त पर्यावरण संवर्धनाला हातभार लागण्याची समाधान लाभेल. ( Navratri 2023)