Black Corn : नैसर्गिक काळे कणीस!

Black Corn
Black Corn
Published on
Updated on

लिमा : निसर्गात अशा काही किमया आढळून येतात, ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. जीव-जंतू असतील किंवा झाडे-रोपे, प्रत्येक ठिकाणी वैविध्यपूर्ण असे काही तरी आढळून येते. आता मक्याचे कणीस एरवी पिवळे असते. जगभरातील कित्येक ठिकाणी पिवळे कणीसच असते. मात्र, काही ठिकाणी चक्क काळे कणीस Black Corn देखील अस्तित्वात असतात.

आता सकृतदर्शनी पिवळे कणीस भाजून झाल्यानंतर ते काळसर Black Corn दिसत असावे, असे वाटेलही. पण, प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. कारण, हे कणीसच नैसर्गिकद़ृष्ट्या काळ्या रंगाचे असते. आश्चर्य म्हणजे पिवळ्या कणसाच्या तुलनेत हे काळे कणीस अधिक स्वादिष्ट मानले जाते. काळे कणीस घेण्याचा कालावधी देखील वेगळा असतो. आता सोशल मीडियावर काळ्या कणसाचे छायाचित्र व्हायरल झाले, त्यावेळी बर्‍याच जणांना ते बनावट वाटणे साहजिक होते. पण, या काळ्या कणसाची वस्तुस्थिती वेगळीच आहे.

या काळ्या कणसाची पाने हलक्या नारंगी रंगाची असतात. ही रोपे 3 मीटरपर्यंत असतात अस्णि त्यावर येणारे मके 20 सेंटीमीटर्सपर्यंतचे असतात. जसजसे या काळ्या मक्याची वाढ होते, तसतसे त्यातील दाणे काळ्या रंगाचे होऊ लागतात. जर या कणसाची पाने काढली तर त्याचा हलका नारंगी रंग बोटांना लागल्याचेही जाणवते. आता हे काळे कणीस Black Corn चवीला अधिक उजवे जरूर असते. पण, पिवळ्या कणसाच्या तुलनेत ते अधिक चावून खावे लागते. या कणसात स्टार्चही बरेच असते. पण, पिवळ्या कणसाच्या तुलनेत ते कमी गोड असते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news