Before Marriage Pregnancy : ‘या’ अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नेंट!

bollywood celebrities
bollywood celebrities
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

बाॅलीवूटडमधील अनेक अभिनेत्री लग्नाआधीचं प्रेग्नेंट (Before Marriage Pregnancy) झाल्या होत्या. विशेष म्हणजे, या अभिनेत्रींपैकी काही जणांनी लग्न करता सिंगल मदर पॅरेंट होऊन मुलाचा सांभाळ केला. तर काहींनी नंतर लग्न केले. (Before Marriage Pregnancy)

लग्नाआधी आई होणाऱ्यां अभिनेत्री खचून न जाता अथवा कुठेलही वाईट पाऊल न उचलता खंबीरपणे उभ्या राहिल्या. आयुष्यात घडणाऱ्या अशा गोष्टींची जाणीव असतानाही त्यांना कुठल्याही गोष्टीचे वाईट वाटले नाही. त्यांनी समाजात स्वत:ला तर सिध्द केले होतेच. पण, कुणाचीही पर्वा न करता त्यांनी आपल्या मुलांना वाढवले.

पाहुया त्या अभिनेत्री कोण आहेत-

नेहा धुपिया आणि अंगद बेदी
नेहा धुपिया आणि अंगद बेदी

नेहा धूपिया

बॉलीवुड अभिनेत्री नेहा धूपिया देखील लग्नाआधी प्रेग्नेंट असल्याने तिने अंगद बेदीशी लग्न केले होते. दोघांनी गुरुद्वारामध्ये लग्न केले. लग्न झाल्यानंतर ६ महिन्यांनी ती आई झाली होती.

महिमा चौधरी
महिमा चौधरी

महिमा चौधरी

अभिनेत्री महिला चौधरी देखील लग्नाआधी प्रेग्नेंट झाल्याचे वृत्त होते. बॉबी मुखर्जीशी तिचे लग्न झालेय ती त्‍याला लग्नाआधीपासून डेट करत होती.

कोंकणा सेन
कोंकणा सेन

कोंकणा सेन शर्मा

अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने रणवीर शौरीशी लग्न केले होते. तिचेही लग्न अचानकपणे झालं होतं. तिने मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यानंतर तिने स्पष्ट केलं होतं की, ती लग्नाआधी प्रेग्नेंट होती. पण, पुढे दोघांचाही घटस्फोट झाला. कोंकणाने आपल्या मुलाचा सांभाळ सिंगल मदर पॅरेंट बनून करत आहे.

मलायकाची बहिण अमृता अरोरा
मलायकाची बहिण अमृता अरोरा

अमृता अरोरा

बॉलीवुड अभिनेत्री अमृतानेदेखील अचानक लग्न करून सर्वांना धक्का दिला होता होता. पण, नंतर वृत्त समोर आलं होतं की, ती प्रेग्नेंट असल्याचे वृत्त समोर आले होते.

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक

वीना मलिक

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने अचानक दुबईतील एका बिझनेसमॅनशी विवाह केला. मीडियामध्ये वृत्त आले की, ती लग्नाआधी प्रेग्नेंट आहे. वीना मलिकने काही महिन्यांनतर मुलाला जन्म दिला होता.

नताशा स्टेनकोविक
नताशा स्टेनकोविक

नताशा स्टेनकोविक

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक लग्नाआधी प्रेग्नेंट असल्याचं जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे हार्दिक-नताशाने लग्न केलं होतं.

विवान रिचर्डसोबत नीना
विवान रिचर्डसोबत नीना

नीना गुप्‍ता

नीना गुप्‍ता यांनी अनेक चित्रपट आणि छोट्‍या पडद्‍यावर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. बेधडक नीना गुप्‍ता यांचं खासगी आयुष्‍य नेहमीच चर्चेत राहिलं.  एका वृत्तपत्राने दिलेल्‍या माहितीनुसार, नीना वेस्ट इंडियन क्रिकेटर विवान रिचर्डसोबत रिलेशनशीपमध्‍ये होत्‍या. त्‍यांची एक मुलगी आहे, जिचं नाव मसाबा गुप्ता आहे. नीना यांनी रिचर्डशी कधी लग्‍न केले नाही. नीना यांनीच मसाबाचा सांभाळ केला. मिसाबा फॅशन डिझायनर आहे. मसाबाने प्रोड्यूसर मधु मनटीना वर्माशी विवाह केला आहे.

अभिनेत्री श्रीदेवी
अभिनेत्री श्रीदेवी

श्रीदेवी

बॉलीवूडची चांदणी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट झाली. ही माहिती त्यांनी स्वत: मीडियाला दिली होती. बॉलीवूडचे प्रसिध्द चित्रट निर्माते आणि बोनी कपूर यांच्याशी त्यांनी लग्न केले. त्यावेळी त्या ७ महिन्यांच्या प्रेग्नेंट होत्या.

अभिनेत्री सारीका, कमल हासन आणि श्रुती हासन
अभिनेत्री सारीका, कमल हासन आणि श्रुती हासन

सारिका

साऊथ सुपरस्टार कमल हासन यांची दुसरी पत्नी सारिका लग्नाआधी प्रेग्नेंट होती. कमल हासन-सारिका यांची मोठी मुलगी श्रुती हासनचा जन्म लग्नाआधी झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news