नाशिक : सिनेस्टाइल मोबाइल चोरून पळणाऱ्या चोरट्यांना पकडले

नाशिक : सिनेस्टाइल मोबाइल चोरून पळणाऱ्या चोरट्यांना पकडले

Published on
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा 
जुना आडगाव नाका परिसरात फोनवर बोलत चाललेल्या युवकाच्या हातातून मोबाइल हिसकावून दुचाकीवरून पळणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. काट्या मारुती पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी आणि चोरट्यांचा पकडा पकडीच्या या खेळाची परिसरात दिवसभर चर्चा रंगली होती. अखेर पोलिसांनी त्या दोघाही चोरट्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करीत बेड्या ठोकल्या.
काट्या मारुती पोलिस चौकीच्या हद्दीत बुधवारी (दि.२९) मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे राहणारा संजय संतु शार्दूल (४७) हा मंगळवारी काठे गल्लीतील नातेवाइकाच्या मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमाला आला होता. रात्री तो काठे गल्लीतून घराकडे जात असताना जुना आडगाव नाका परिसरात असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रात्री १२.३० च्या सुमारास त्याला फोन आला म्हणून तो मंदिराजवळ फोनवर बोलत होता. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने शार्दूलच्या हातातून मोबाइल हिसकावला व ते काठ्या मारुती पोलिस चौकीच्या रस्त्याने पळू लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय सुनील चारोस्कर (२०), अंकुश अरुण गायकवाड (रा. फुलेनगर, पेठ रोड) अशी जबरी लूट करणाऱ्या सराईत नावे आहेत. पोलिसांनी दोघाही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी चोरीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशी घडली घटना…
शार्दूल याच्या हातातून मोबाइल हिसकवताच त्याने चोर चोर अशी आरडा ओरड केली. यावेळी काट्या मारुती पोलिस चौकीतील रात्रीच्या ड्यूटीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, देवराम वनवे, अनिल मोरे, यांनी लागलीच दुचाकी काढून हिरावाडी रोडकडे पाळणाऱ्या पल्सरचा पाठलाग सुरू केला आणि दवे फरसाण समोर दुचाकीला आडवे होऊन एकाला पकडले. तर दुसरा दुचाकी घेऊन पसार झाला. याच दरम्यान रात्र गस्तीवर असलेले विष्णू जाधव, संदीप सानप हिरावाडीतून गस्त घालून येत असताना त्यांनाही हा प्रकार समजताचं त्यांनी हिरावाडीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या प्लसरचा पाठलाग करून दुसऱ्या संशयिताला ही पकडण्यात यश आले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news