नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

नाशिक (मनमाड) : रईस शेख

मनमाडला नऊ वर्षाचा लोकेश सोनवणे या चिमुकल्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले असून राहुल उर्फ सोन्या पवार असे या नराधमचे नाव आहे. लोकेश त्याच्या घराजवळ खेळत असताना खाऊचे अमिष दाखवून आरोपीने त्याला निर्जनस्थळी नेले. त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून केल्याचे आरोपीने पोलिसांकडे कबुलीजबाब दिला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरण, खून आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक समीरसिंग साळवे यांनी यासंदर्भात माहिती दिली. आरोपी राहुल हा लोकेशच्या घराजवळच वास्तव्यास होता. अशा नराधमाला थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनाकडून होत आहे

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news