नाशिक : कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टवर सात नवे विश्वस्त

नाशिक : कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टवर सात नवे विश्वस्त
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या विश्वस्तपदी ७ सदस्यांची नियुक्ती २ वर्षांच्या कालावधीसाठी धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी जाहीर केली. धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातून विश्वस्तपदाच्या अर्ज सादरीकरणासाठी दि. २४ एप्रिल रोजी पत्रक काढण्यात आले होते. या विश्वस्तपदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे होती. यावेळी शहरभरातून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वकील, पत्रकार आदींसह जवळपास ५४ अर्ज आले होते.

धर्मादाय सहआयुक्तांकडून आलेल्या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर १४ जून रोजी विश्वस्तपदाच्या मुलाखतीचे पत्रक सूचनाफलकावर लावण्यात आले. त्यानुसार ५४ जणांनी दि. २१ ते २८ जूनदरम्यान मुलाखती दिल्या. ५४ अर्जदारांपैकी ७ जणांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मागील विश्वस्तांमधून मंडलेश्वर काळे यांची पुन्हा निवड करण्यात आली असून, जुन्या विश्वस्तांपैकी ते एकमेव विश्वस्त असून, इतर सर्व नवीन आहेत. आता नव्याने आलेले विश्वस्त आणि पुजारी यांची सांगड कशी बसते, जुने प्रलंबित असलेली मंदिराची कामे कशी मार्गी लागतात, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागून आहे.

नवीन विश्वस्त असे…

सुनील तुलसीदास पटेल, श्रीकांत मदनलाल राठी, प्रशांत खंडेराव जाधव, अक्षय प्रकाश कलंत्री,

मंडलेश्वर महादेवराव काळे, रावसाहेब कोंडाजी कोशिरे, श्रद्धा अमित

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news