नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून बारावीच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने पास होणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे अंजुम कांदे यांनी जाहीर केले आहे.
तालुक्यातील ढेकू सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता तसेच संत सेवालाल महाराज मंदिर प्राणांगणात श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी कांदे बोलत होत्या, जंयती दरम्यान अंजुम यांनी मुलींच्या शिष्यवृत्तीबाबतची माहिती दिली. अंजुम कांदे म्हणाल्या, बंजारा समाजाप्रती नेहमीच आमदार कांदे आणि आम्हा सर्व कुटुंबीयांना प्रेम असून यापुढे देखील राहिल. तसेच आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बंजारा समाजातील तरुण मोठ्या संख्येने भारतीय सेनेत सेवा देत असून, त्यातील काही जवान जंयती कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या उपस्थित जवानांचा कांदे यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी कुमारी गायत्री सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने उत्कृष्ट मनोगत व्यक्त केल्याने, अंजुम यांनी गायत्रीस ५०१ रुपयांचे बक्षीस देत तिचा सत्कार केला. शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्या जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे, एन के राठोड, कांतीलाल चव्हाण, खूपचंद चव्हाण, भोपालाल राठोड गोरख चव्हाण, ढेकू ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य आदींसह बंजारा समाजातील बांधव भगिनी उपस्थित होते.