नाशिक : सातपूरला काढली खंडणीखोरांची धिंड

नाशिक : सातपूरला काढली खंडणीखोरांची धिंड
Published on
Updated on

नाशिक (सातपूर) : नाशिकच्या सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोडे, हाणामारी, पैसे उकळण्याचे प्रकार घडत असून, सातपूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या संशयितांची परिसरातून धिंड काढली.

तीन दिवसांपूर्वी सातपूर गाव प्रवेशद्वार परिसरातील फळविक्रेत्याकडून बळजबरीने पैसे मागण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 जणांना अटक केली होती. दरम्यान या परिसरात कायमच असे प्रकार घडत असल्याने पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळून पोलिसांचा धाक निर्माण व्हावा, यासाठी सातपूर मार्केट परिसरातून संशयितांची धिंड काढली. गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्या गुन्हेगाराविरोधात अनेक तक्रारी येत असल्यने पोलिस त्यांच्या मागावर होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news