Nashik News | गंगापूर जकात नाक्यावर वाहनांची तोडफोड

नाशिक : मद्यपींनी केलेल्या दगडफेकीत वाहनाचे झालेले नुकसान.
नाशिक : मद्यपींनी केलेल्या दगडफेकीत वाहनाचे झालेले नुकसान.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर जकात नाका येथे मंगळवारी (दि.१३) रात्री मद्यपी टोळक्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत करण्याचा प्रयत्न केला. यात तीन वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून एक संशयित फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गंगापूर पोलिस ठाण्यात जय गजभिये (रा. प्रमोद नगर) यांनी फिर्याद दिली. ते त्यांच्या वाहनाने मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास गंगापूर जकात नाका येथून जात होते. त्यावेळी तिघा संशयितांनी रस्त्यात गोंधळ घालत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना थांबवले. तसेच तीन वाहनांची तोडफोड करीत वाहनचालकांना शिवीगाळ केली. या प्रकाराने परिसरात दहशत पसरली होती. तीन वाहनांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास करीत दोघांना ताब्यात घेतले, तर एक संशयित फरार झाला आहे. संशयित मद्य पिऊन तोडफोड करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news