Nashik News : गारपिटीने भाजीपाला महागला, जेमतेम २५ टक्के आवक झाल्याने उसळी

Nashik News : गारपिटीने भाजीपाला महागला, जेमतेम २५ टक्के आवक झाल्याने उसळी

नाशिक पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याला बसला आहे. एरवी असलेल्या आवकेपेक्षा ७५ टक्क्यांनी कमी आवक झाल्याने बाजारभाव उसळले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहे.

जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षे, कांदे, नगदी पिके यांसोबतच भाजीपाल्याचे देखिल नुकसान मोठ्या प्रमणात झाले आहे. हे नुकसान झाल्याने रोज बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या भाजीपाल्याची आवक अतिशय कमी झाली. इतर वेळी दोन ते अडीच हजार क्विंटल असलेली भाज्यांची आवक आज (दि २७) चारशे क्विंटल झाली आहे. मेथी, शेपू, यांच्यासह इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये तुलनेने वाढ दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी अगदी पाच ते दहा रुपयांवर आलेली कोथिंबिरची मोठी जुडी आता ३० रुपयांवर गेली आहे. याचबरोबर मेथी आणि शेपु मोठी जुडी १५ ते २० रुपयांना मिळत आहे.

बाजार समितीतील भाज्यांचे दर (क्विंटलमध्ये)

भाजीकिमान-कमाल भाव (रु.)
भेंडी1665-3330
गवार10000-15000
वाटाणा2000-4100
कोथिंबिर900-2800
मेथी700-1500
शेपु800-1600
टोमॅटो400-4000
वांगी2500-4500
शिमला मिरची2500-5000
भोपळा670-1335
कारले585-1385
डोडका3335-5000

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news