Nashik News | ‘त्या’ शिक्षकावर ‘सुमोटो’चा वापर होण्याची शक्यता, बालहक्क आयोगाकडून चाचपणी सुरू

Nashik News | ‘त्या’ शिक्षकावर ‘सुमोटो’चा वापर होण्याची शक्यता, बालहक्क आयोगाकडून चाचपणी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील एका आदिवासी शाळेतील २० विद्यार्थिनींशी शिक्षकाकडून अश्लील वर्तन झाल्याची घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आली होती. पोलिसांनी याबाबत पालकांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल होईल, अशी भूमिका घेतल्याने आता बालहक्क आयोगाने या संदर्भात सुमोटो वापरून गुन्हा दाखल करता येईल का, याबाबत आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्यासोबत चर्चा केल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत होता. त्याच्याकडून असे प्रकार वारंवार सुरू होते. या प्रकरणी काही मुलींनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पालकांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला आणि संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर आदिवासी उपायुक्तांनी तत्काळ संबंधित शिक्षकाचे निलंबन केले. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. यासंदर्भात विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणी कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी केली होती. मुलींनी दिलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन करीत विनयभंग केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा अहवाल विशाखा समितीने प्रकल्प कार्यालयास सादर केला होता.

सुमोटो कोण दाखल करणार

बालहक्क आयोग सुमोटो वापरून गुन्हा दाखल करणार असले तरी हा सुमोटो कोण वापरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्यानंतर मुख्यध्यापकांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे मुख्याध्यापकांना सांगितल्यास ते किती गांभीर्याने दखल घेणार याबाबत देखील साशंकता आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news