नाशिक : एनडी पटेल लिंक रोडवर डांबर घेऊन जाणारा ट्रक पलटी, कर्मचारी जखमी

पलटी झालेला ट्रक
पलटी झालेला ट्रक

नाशिक पुढारी वृत्तसेवा :  येथील एनडी पटेल लिंकरोडवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास गरम डांबर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या घटनेत एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

येथे स्मार्टसिटी अंतर्गत रस्त्याचे काम सुरु आहे. दरम्यान गरम डांबर असलेला ट्रक मागे-पुढे करत असताना, ट्रकचे टायर खड्ड्यात फसल्याने ट्रक अचानक उलटला. गरम डांबर अंगावर पडल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशन करत असून जखमी झालेला कर्मचारी मुळचा मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news