Nashik Lok Sabha Elections : …तर छगन भुजबळांविरोधात युवराज संभाजीराजे मैदानात

Nashik Lok Sabha Elections : …तर छगन भुजबळांविरोधात युवराज संभाजीराजे मैदानात
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज माजी खासदार युवराज संभाजीराजे पुन्हा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार असतील, तरच त्यांच्या विरोधात संभाजीराजे शड्डू ठोकणार असल्याची माहिती 'स्वराज्य'च्या पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. (Nashik Lok Sabha Elections)

वास्तविक, गेल्या काही महिन्यांतील संभाजीराजेंचे नाशिक दौरे लक्षात घेता, ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यातच त्यांनी गतवर्षी कोल्हापूर सोडून प्रथमच नाशिकमध्ये सहपरिवार आपला वाढदिवस साजरा केल्याने या चर्चेला बळकटी मिळाली होती. मात्र, मधल्या काळात नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडल्याने, त्यांचे नाव मागे पडले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून, भुजबळांविरोधात ते निवडणुकीच्या मैदानात उभे राहण्याची तयारी करीत असल्याचे बोलले जात आहे. भुजबळांकडून सातत्याने ओबीसीच्या कोट्यातून दिल्या जाणाऱ्या मराठा आरक्षणाला विरोध दर्शविला जात असल्याने, मराठा समाज त्यांच्या विरोधात असल्याचे वातावरण आहे. याच कारणामुळे संभाजीराजे भुजबळांविरोधात रिंगणात उभे राहणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, येत्या ११ फेब्रुवारी रोजी संभाजी राजे यांचा वाढदिवस असून, त्या दिवशी आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून अन् कोणत्या मतदारसंघात लढविणार असल्याची घोषणा त्यांच्याकडून केली जाण्याची शक्यता आहे. नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधून ते निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे स्वराज्यमधील पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. (Nashik Lok Sabha Elections)

भुजबळ-संभाजीराजे सामना कसा रंगणार? (Nashik Lok Sabha Elections)

नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेनेचा (शिंदे गट) असून, ही जागा युतीत भाजपला जाण्याची जोरदार चर्चा आहे. अशात युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे छगन भुजबळ या मतदारसंघातून रिंगणात कसे उभे राहणार? असा प्रश्न आहे. शिवसेनेला (शिंदे गट) जरी ही जागा सोडली गेली, तरी छगन भुजबळ या मतदारसंघावर दावा करू शकणार नाहीत. अशात भुजबळ-संभाजीराजे सामना रंगण्याची दुरान्वये शक्यता तूर्तास तरी दिसून येत नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news