Nashik Leopard News : सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणच्या आदिवासी पट्ट्यात बिबट्यांची दहशत

AI Image
AI Image

सटाणा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- बागलाण पश्चिमेकडील आदिवासी पट्टयातील आरम व हत्ती नदी परिसर खोरे बिबट्यांचे वसतिस्थान झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेत शिवारात वस्ती करून राहणा-यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत शिवारातील तसेच वाड्या- वस्त्यांवरील पाळीव कुत्रे, मांजरी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वासरू, पारडू फस्त करून आता बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी 'सातच्या आत घरात' कोंडून घेण्याची वेळ आली आहे. (Nashik Leopard News)

जोरण शिवारातील अंबादास देवरे यांच्या शेतात बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला. तसेच विनायक देवरे यांच्या बैल गोठ्यात सुरक्षित कोंडून ठेवलेला त्यांचा पाळीव कुत्रा सोडताच बिबट्याने त्याच्यावर झडप घालून कुत्रा फस्त केला. गेल्या डिसेंबर, जानेवारीमध्ये हत्ती नदीलगत जोरण स्मशानभूमीजवळ मोटरसायकलस्वाराने
तीन बछड्यांसह बिबट्या पाहिला होता. घाबरून मोटरसायकल पळविण्याच्या प्रयत्नात बछड्याला जबर मार लागून बछडा जागीच गतप्राण झाला. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने काही मोटरसायकलस्वारांवरही झडप घातल्याने जोरण येथेही पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र तेथेही पिंजरा बसविण्यात आला नाही. (Nashik Leopard News)

गेल्या वर्षभरापासून बागलाण तालुक्यातील कंधाणे, निकवेल, तिळवण, निरपूर, सरवर, वरदर शिवार, डांगसौंदाणे, चाफापाडे, मोरकुरे, पठावे, तळवाडे, किकवारी, जोरण, विंचुरे, वटार, चौंधाणे, केरसाणे, दसाने, मुंगसे आणि परिसरात अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याचे चित्र आहे.

कंधाणे, विंचुरे, जोरण, किकवारी, तळवाडे, तिळवण, निरपूर आणि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेत शिवारात जीव मुठीत धरून राहावे लागते. वनविभागाने टाळाटाळ न करता कंधाणे शिवारात दोन-तीन ठिकाणी तातडीने पिंजरा बसून नागरिकांना दिलासा द्यावा.
– बंटी पाटील, सरपंच, कंधाणे

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news