नाशिक : पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

नाशिक : पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील अधरवड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. हंसराज श्रावण बंजारा (वय ५२) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. रमाई घरकुल योजनेच्या घरकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून देत घरकुलाचे शासकीय हप्ते विनाअडथळा तक्रारदाराच्या बँक खात्यावर जमा करायचे होते. या कामाच्या मोबदल्यात बंजारा याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.

लाच स्वीकारताना हंसराज बंजारा यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, नाईक प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, नितिन कराड, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news