नाशिक : प्रल्हाद पाटील-कराड यांच्यांवर अंत्यसंस्कार; सहकार, शिक्षण, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

नाशिक : प्रल्हाद पाटील-कराड यांच्यांवर अंत्यसंस्कार; सहकार, शिक्षण, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
Published on
Updated on

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

निफाड शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हाद पाटील-कराड यांच्या पार्थिवावर सोमवार सकाळी त्यांच्या मूळ गावी निफाड तालुक्यातील जळगाव येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सहकार, शिक्षण, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

सकाळी 7 ते 8 या दरम्यान त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी जळगाव येथील ग्रामसंस्कार केंद्रात ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व जळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार अनिल कदम, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे, मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड, निसाकाचे माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार, भाजप नेते दिनकर पाटील, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उदय सांगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, आयएमएचे महेश वालू, रतन पाटील वडघुले, लक्ष्मण कापसे आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

याप्रसंगी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ॲड. आप्पासाहेब उगावकर, राजेंद्र डोखळे, निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, हेमंत धात्रक, पी. आर. गिते, सुरेश घुगे, डी. पी. आव्हाड, शंकरराव कोल्हे, भास्कर सोनवणे, दामोदर मानकर, लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, राजेंद्र जायभावे, जगन कुटे, सुनील केदार, वि. दा. व्यवहारे, सुदाम सांगळे, व्ही. के. सांगळे, पुंजाराम सांगळे, दिगंबर गिते, भागवत बोरस्ते, गोकुळ गिते, सुरेश कमानकर, जे. डी. केदार, विनायक शेळके, उद्धव कुटे, भीमराज काळे, भाऊसाहेब कातकाडे यांच्यासह जिल्ह्यातील सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पवार, ठाकरेंचे शोकसंदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शोकसंदेश पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार रोहित पवार यांनी प्रल्हाद पाटील-कराड यांचे चिरंजीव विश्वास कराड यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news