लग्‍न माझ्या निरोगी आयुष्‍याचे रहस्‍य; नव्वदीत पाचव्यांदा बोहल्‍यावर, अजून एक करण्याची इच्छा | पुढारी

लग्‍न माझ्या निरोगी आयुष्‍याचे रहस्‍य; नव्वदीत पाचव्यांदा बोहल्‍यावर, अजून एक करण्याची इच्छा

रियाध : सौदी अरेबियातील एका 90 वर्षांच्या व्यक्तीने पाचव्यांदा निकाह केला आहे. ‘मला पाचपेक्षा अधिक लग्न करण्याची इच्छा आहे’, असेही या माणसाने बोलून दाखवले आहे. नादिर बिन दहैम वाहक अल मुर्शीद अल ओताबी असे या व्यक्तीचे नाव आहे. अफीक प्रांतात त्याने आपल्या लग्नाची मेजवानी दिली.

सोशल मीडियावर सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. यात काही जण त्याला पाचव्या लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तर, वृद्ध व्यक्तीही आपले नवे लग्न झाल्यामुळे उत्साहित आहे. इतकेच नव्हे तर, वृद्ध व्यक्तीच्या नातवानेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लग्नासाठी आजोबांना खूप खूप शुभेच्छा, तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मी प्रार्थना करेन’, असेही तो व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

या व्यक्तीने म्हटले आहे की, या निकाहानंतर मी पुन्हा निकाह करू इच्छितो. वैवाहिक जीवन सर्वात शक्तिशाली असते. लग्न केल्याने आयुष्यात शांती आणि संसारात समृद्धी येते. लग्नच माझ्या निरोगी आयुष्याचे रहस्य आहे. अल ओताबी यांना पाच मुले होती, त्यामधील एकाचा मृत्यू झाला.

Back to top button