माळशेज घाटात इनोव्हा व नॅनो कारची समोरासमोर धडक | पुढारी

माळशेज घाटात इनोव्हा व नॅनो कारची समोरासमोर धडक

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : माळशेज घाटातील फांगुळगव्हाण परिसरात इनोव्हा कार व नॅनो कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीविततहानी झाली नसल्याची माहिती टोकावडे (जि. ठाणे) पोलिसांनी दिली. दोन्ही कारच्या धडकेनंतर इनोव्हा कार घाटाच्या कठड्यावर अडकली होती, अडकलेल्या इनोव्हाला काढण्यासाठी लावलेले दोरखंड अचानक तुटल्याने कार ३० फुट खोल असलेल्या ओढ्यात कोसळली. हा अपघात सोमवारी (दि १७) सायंकाळी पाच वाजनेच्या सुमारास घडला. टोकावडे पोलीस अपघातस्थळी तात्काळ दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोन्ही वाहनांमधील पर्यटक हे माळशेज घाटातील नयनरम्य धबधबे न निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी आल्याचे समजते. परंतु घाट परिसरात पडत असलेल्या संततधार पाऊस व दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटकांना घाटातील धोकादायक स्थळी जाण्यास मज्जाव केला असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला आहे, परंतु अतिउत्साही पर्यटक दाद देत नसल्याची बाब समोर येत आहे.

हे ही वाचा : 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घातला डायलिसिस सेंटरच्या खासगीकरणाचा घाट

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या प्रेयसीचा चाकूने भोसकून निर्घृण खून

Back to top button