Nashik Fraud News : हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार 

Nashik Fraud News : हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार 

नंदुरबार ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील हिरा उद्योग समुहाच्या होलसेल व किरकोळ मद्य विक्री दुकानात आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करून १० कोटी २९ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी नंदुरबार येथील हेमचंद्र मोतीराम चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी, २ मुले, सूने विरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud News)

संबधित बातम्या :

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनूसार, हिरा उद्योगाच्या वतीने सागर विश्वनाथ सुरळकर यांनी फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुळचे नंदुरबार येथील मंगळ बाजारात किरकोळ धान्य दुकान चालविणारे व सद्या नाशिक येथे स्थायिक असलेले हेमचंद्र मोतीराम चौधरी यांच्यावर हिरा उद्योग समूहाच्या नाशिक येथील विविध होलसेल व किरकोळ मद्यविक्री दुकानाच्या व्यवहाराची जबाबदारी गत २० वर्षांपासून देण्यात आली होती. परंतू, हेमचंद्र मोतीराम चौधरी यांनी दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत आपल्या परिवारातील सदस्यांशी संगनमत करून हिरा उद्योगाचा विश्वास संपादन करून व्यवसायातील व नफ्याची रक्कम व्यवसायामध्ये वापरत असल्याचे भासवून तसेच हिरा उद्योग समूहाचा विश्वासघात करीत धनादेशाच्या गैरवापर करीत, स्टॉक, रोख रक्कम, बिलात हेराफेरी करुन बरीचशी रक्कम परिवारातील सदस्यांच्या नावाने बँक खात्यावर परस्पर वळविली. तसेच मद्यविक्रीचा दुकानातील नोंदीत बदल करून एकूण १० कोटी २९ लाखाचा अपहार केला.

हेमचंद्र चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाच्या कंपन्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करुन विश्वासघात करीत आर्थिक फसवणूक केली. या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात हेमचंद्र मोतीराम चौधरी, रत्ना हेमचंद्र चौधरी, निलेश हेमचंद्र चौधरी, मयूर हेमचंद्र चौधरी, मिनल मयुर चौधरी राहणार नाशिक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news