नाशिक : शिवराज्याभिषेक सोहळ्याने फिटले पारणे; आज नारायणबापू चौकात मुलाखत

नाशिकरोड : विविध खेळाची प्रात्यक्षिके दाखवितांना युवक. (छाया : उमेश देशमुख) 
नाशिकरोड : विविध खेळाची प्रात्यक्षिके दाखवितांना युवक. (छाया : उमेश देशमुख) 
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा 

जेलरोडची शिवराज्याभिषेक समिती व टीम ध्येयपूर्तीतर्फे जेलरोडच्या नारायणबापू चौकात चार दिवसांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात लेझर शो, शिवकालीन युध्दकला व मर्दानी खेळाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रवींद्र जगदाळे यांचे शिवरायांच्या युध्दनीतीवर व्याख्यान झाले. रविवारी (दि. ४) 'संभाजी व पानिपत' कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची 'शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेकापर्यंतचा' प्रवास या विषयावर आनंद क्षेमकल्याणी मुलाखत घेणार आहेत.

संयोजक कैलास आढाव, राजाराम लोखंडे, नामदेव आढाव, सचिन हांडगे, विलास आढाव, दिलीप आढाव, कुलदीप आढाव, गणेश सातभाई, राहुल कोथमिरे, विजय लोखंडे, विनायक आढाव, प्रसाद आढाव, ॲड. शरद आढाव, कल्पेश बोराडे, शरद आढाव, मयूर आढाव, राम आढाव, विशाल पगार, योगेश कपिले, ओंकार लभडे आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी पुणे येथील युवकांनी हलगीच्या तालावर रामोशी कुऱ्हाडी, ढाल-तलवार, दांडपट्टा, भाला, चक्र, शूल, लाठी-काठी या खेळाची प्रात्यक्षिके दाखविली. रवींद्र जगदाळे म्हणाले की, महाराजांनी गनिमी काव्याने युद्धे लढली असली तरी मैदानी युध्दातही पराक्रम गाजविला. या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी मुलांवर लहानपणापासूनच संस्कार करावेत. नाशिकच्या शंभू नाद पथकाने ढोल वादन आणि भगवे झेंडेधारी युवकांनी तालनृत्य सादर केले. विंचूर दळवीतील ज्ञानेश संगीत विद्यालय वारकरी शिक्षण संस्थेतर्फे प्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांनी 'उगवला तारा तिमिर हारा, गर्जा शिवाजी राजा…', 'रायगड किल्ला महाराष्ट्राची शान…', 'शिवरायांची तलवार…', 'दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती…' आदी पोवाडे सादर केले. ओमकार भुसारे, जयदेव भुसारे, बाळकृष्ण रिकामे, सोमनाथ भुसारे यांनी वाद्य साथसंगत केली. आत्मा मालिक ज्ञानपीठातर्फे मयूर देशमुख यांनी 'नमो नमो ओंकार स्वरूपा.. ', झाला महाराष्ट्राचा राजा, शिवबा राजा गं.. , आधी होता वाघ्या, दैव योग्य झाला पाग्या.. ' आदी भारुडे सादर केली. त्यांना योगेश पवार, अमेय ढालकरी, आकाश गवळी, ओमकार सोनवणे, रेश्मा देशमुख, पुष्पा देशमुख, कविता पिते यांनी गायनाची तर वैभव काळे, प्रसाद चव्हाण यांनी वाद्याची साथसंगत केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news