नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता सुभाष धनगर व लिपीक नितीन अनिल जोशी (४५, रा. तपोवन) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांचीही मंगळवारी (दि.६) सायंकाळी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
धनगर व जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. २) ५५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी दोघांनाही न्यायालयाने मंगळवार (दि.६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत धनगर यांच्या घरात ८५ लाख रुपयांची रोकड, ३२ तोळे सोन्याचे दागिने, बँक खात्यात ३० लाख रुपये, दोन फ्लॅट व एक प्लॉट अशी मालमत्ता आढळून आली आहे. मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांनाही न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांनाही मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.