नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने | पुढारी

नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने

नाशिक :

लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली असून या घरझडतीत तब्बल 85 लाखांची रोकड व 32 तोळे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे.

तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल (दि. 2) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

या कारवाई नंतर धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली. या घरझडतीमध्ये 85 लाख रुपये कॅश, 45 तोळे सोने आणि तीन प्रॉपर्टीचे कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहे. तसेच घरही सील करण्यात आले आहे. धनगर यांचे नाशिकमध्ये दोन फ्लॅट आणि एक प्लॉट आहे. ते राहत असलेला फ्लॅटची किंमत दीड कोटी रुपये इतकी आहे. धनगर यांचा आडगावला प्लॉट आणि टिळकवाडीत दुसरा फ्लॅट आहे. दरम्यान धनगर यांची बॅंक खाती तपासणे अद्याप बाकी आहे. या कारवाईनंतर महापालिकेच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Back to top button