नाशिक : वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची एकजूट

नाशिक : वन रँक वन पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करताना माजी सैनिक. (छायाचित्र : हेमंत घोरपडे)
नाशिक : वन रँक वन पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करताना माजी सैनिक. (छायाचित्र : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वन रँक वन पेन्शनसाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे माजी सैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक एकवटले आहेत. या माजी सैनिकांनी सोमवारी (दि. ३) जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.

भारतीय माजी सैनिक संघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सीमांचे रक्षण करून निवृत्त झालेले सैनिक यांच्यासह युद्ध विधवा, वीरपत्नी, वीरमाता वीरपिता यांच्या पुनर्वसन व कल्याणासाठी संघटना कार्यरत आहे. दिल्ली येथे वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांनी आंदोेलन सुरू केले आहे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात असून या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पवार व सचिव पी. यू. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news