किसान क्रेडिट कार्ड घोटाळा; चौकशीचे निर्देश देण्याच्या विनंतीची याचिका फेटाळली | पुढारी

किसान क्रेडिट कार्ड घोटाळा; चौकशीचे निर्देश देण्याच्या विनंतीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : किसान क्रेडिट कार्ड प्रणालीतील आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. देशभरात बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घोटाळे केले जात आहेत, असा दावा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता.

या प्रकरणात करण्यात आलेले दावे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. त्यामुळे कलम 32 चा अवलंब करीत चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी खंडपीठाने केली. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे दाद मागण्याचा सल्लाही न्यायालयाने याचिकाकर्ते चंद्रशेखर मणी यांना दिला. किसान क्रेडिट कार्ड प्रणालीतील घोटाळ्याबाबत देशाच्या विविध भागात गुन्हे दाखल झाले असल्याचा युक्तिवाद मणी यांनी केला होता. मात्र, खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा 

Back to top button