नाशिक : पेटत्या दिव्याने भाजल्यामुळे वृध्देचा मृत्यू

नाशिक : पेटत्या दिव्याने भाजल्यामुळे वृध्देचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

दिवा पेटविताना तो अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुशीला भागीरथ धूत (७४, रा. जाजू पार्क, सावतानगर, सिडको) असे गंभीर भाजल्याने मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. धूत २३ फेब्रुवारीला सकाळी ११.३० च्या सुमारास घरी दिवा पेटवत असताना पेटता दिवा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. त्यांना औषधोपचारासाठी त्यांचे जावई दगडू हेडा यांनी श्रीगुरुजी रुग्णालयात दाखल केले होेते. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पोलिस नाईक बनतोडे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news