नाशिक : शितकड्याच्या दरीत दोन युवकांचे मृतदेह, सप्तशृंगी गडावर दोन वेगवेगळ्या घटना

मृतदेह
मृतदेह

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंग गडाच्या प्रसिध्द शीतकडयाच्या दरीत भातोडे (ता. दिंडोरी) शिवारात दोन वेगवेगळ्या घटनात दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. वणी पाेलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

याबाबत माहिती अशी की, भातोडेचे पोलिस पाटील विजय राऊत यांनी भातोडे गावाजवळच गडानजीक मृतदेह असल्याची वणी पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास केला असता ज्ञानेश्वर संजय महानोर (वय २२. रा. टिपे पो. वडेल ता. मालेगाव) हा युवक सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवासाठी आलेला होता. मात्र यात्रोत्सव होवूनही घरी न परतल्याने नातेवाईकांनी तपास सुरू केला होता. तसेच सप्तशृंग गडावर आज नातेवाईक सकाळी साडेदहाच्या सुमारास शोध घेत असताना ज्ञानेश्वरचा मृतदेह शितकड्याच्या पायथ्याशी असलेल्या भातोडे शिवारात आढळून आला.

दुसऱ्या घटनेत तुषार संजय हिरे ( वय २६, रा. लखानी ता. मालेगाव) सात एप्रिलला सकाळी भातोडे शिवार जंगलात ७ किमी उत्तरेस शीतकड्यावरुन दरीत खाली पडुन हातापायास आणि डोक्यास गंभीर मार लागल्याने मयत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news