Nashik Crime : लासलगावी पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवत २६ हजारांची लूट

Nashik Crime : लासलगावी पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवत २६ हजारांची लूट
Published on
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील साईबाबा पेट्रोल पंपावर चाकूचा धाक दाखवत सव्वीस हजार रुपये लूटून नेल्याची घटना (दि. २१) रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भरवस फाटा येथील साईबाबा पेट्रोल पंपावर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पेट्रोलपंपावर झालेल्या जमा खर्चा बाबत सेल्समन बंडु व प्रितम यांच्याकडुन हिशोब घेत असतांना कोणीतरी ऑफिसचे शटर वाजवले. म्हणुन त्यांनी शटर उघडले असता एकजण जबरदस्तीने ऑफिस मध्ये घुसला, त्याच्या पाठोपाठ इतर चारजण ऑफिस मध्ये घुसले. तेव्हा त्यातील एकास दिपेश व बंडु यांनी ओळखले, तो. मरळगोई येथील सोपान निवृत्ती जगताप हा होता.

यातील एकाने त्याच्या खिशातील चाकू काढुन बंडुच्या पोटाला लावला. तसेच सोपान जगताप याने त्याच्या खिशातून चाकू काढून दिपेशला धाक दाखवून त्याच्या कडील कॅश काउंटरची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने कॅश काउंटर उघडुन त्यात ठेवलेले रोख रक्कम २६३००/- रुपये काढुन घेतले. त्या नंतर त्यातील दोघांनी पेट्रोल अॅटो मशिनचे मॉनीटर उचलून जोरात खाली आपटुन फोडले व काउंटरवर ठेवलेले पैसे मोजायचे मशिन उचलून खाली जमिनीवर आपटुन फोडुन नुकसान केले. सोपान जगताप आणि त्यासोबत असलेल्या इतर चौघांनी ऑफिसचे शेजारी असलेल्या रूम मध्ये जावून रुम मधील सीसीटीव्ही कॅमे-यांचे डीव्हीआर बॉक्सच्या वायरी चाकुने कापुन डीव्हीआर मशीन सोबत घेवून तुम्ही जर कोणाला काही सांगितले तर तुम्हाला मारुन टाकु "असा दम भरत पळून गेले. या घडलेल्या घटनेने परिसरात घबराट झाली आहे.

याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news