Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; सिब्बल यांची मागणी | पुढारी

Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; सिब्बल यांची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांना बर्खास्त करण्याची मागणी राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी केली आहे. राज्यात अनुच्छेद ३५६ नूसार राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच सरकारने देशातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी देखील सिब्बल यांनी शनिवारी केली.

निर्भया प्रकरणानंतर देखील देशात कुठलाही बदल झालेला नाही. उन्नाव, हाथरस, कठुआ आणि बिलकिसन (प्रकरणातून आरोपींची मुक्तता). मुलींना वाचवा पंतप्रधान जी, अशी भावना ट्विटरवरून सिब्बल यांनी व्यक्त केली.

अनुच्छेद ३५६ नुसार कुठल्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. राज्याचे शासन घटनेच्या तरतूदींनूसार चालवले जात नसले तर हे पाऊल उचलले जाते. मणिपूरमधील चार मे चा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बुधवारी राज्यात पुन्हा एकदा तणाव वाढला. मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (ST) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ मणिपूरमधील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून १६० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

‘पुरुषाच्या शिरच्छेदाचा’ आणखी एक व्हिडिओ व्हायरल

मणिपूर हिसांचारादरम्यान महिलांच्या नग्न परेडचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. त्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर मणिपूर हिंसाचरादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला आहे. यामध्ये एका पुरुषाचे धडावेगळे केलेल्या डोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे तेथील संघर्षाच्या रानटीपणाची पातळी पुन्हा एकदा समोर आली आहे. दोन्ही व्हायरल व्हिडिओ कुकी समुदायातील आहेत. या व्हायरल व्हिडिओतील घटना दोन जुलै रोजी झाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button