येवल्यातील जुने शिवसैनिक किशोर सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी रविवार, दि. 5 छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जुन्या छायाचित्रांचा अल्बम छगन भुजबळ यांना दाखविला. जुने फोटो बघताच छगन भुजबळ यांनी येवल्यातील सभा स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.दादा कोंडके इतर नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित शिवसैनिकांसमवेत जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये छगन भुजबळ व कार्यकर्ते रममान झाल्याचे बघावयास मिळाले. येवल्यातील शिवसेना शाखा स्थापनेबाबत जुन्या कार्यकर्त्यांची छगन भुजबळ यांनी आस्थेने चौकशी केली. यावेळी शिवसैनिक किशोर सोनवणे, बाजीराव भोर, चंद्रमोहन मोरे, गणेश सोनवणे, अर्जुन मोडसे, भागीनाथ थोरात यांनी भेट घेत छगन भुजबळ यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देत सन्मान केला.